-
मराठी अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पहिल्या पर्वामुळे घराघरात पोहोचली आणि तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
-
सईने प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे.
-
सध्या सई कौटुंबिक सहलीसाठी कर्नाटक (Karnataka) राज्यातील उडुपी (Udupi) येथे गेली आहे.
-
सईने २०२० मध्ये तीर्थदीप रॉय (Tirthadeep Roy) यांच्याशी विवाहगाठ बांधली. २०२३ मध्ये त्यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले; त्यांनी तिचे नाव ‘ताशी’ (Tashi) असे ठेवले आहे.
-
उडुपी हे दक्षिण कर्नाटकातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक अत्यंत प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि धार्मिक शहर आहे.
-
उडुपी हे शहर तेथील संस्कृती, प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर आणि जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘उडुपी पाककृतीं’साठी ओळखले जाते.
-
सई मूळची कर्नाटकातील बेळगाव येथील आहे. तिची आई वीणा लोकूर या मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)
नवरात्रीत घरात अखंड दिवा का लावावा? जाणून घ्या योग्य दिशा, नियम आणि पूजा पद्धत