-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वचन दिले तू मला’ (Vachan Dile Tu Mala TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) ‘ऊर्जा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकताच मालिकेच्या सेटवर ‘ऊर्जा’चा पहिला मंगळागौरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिला हा सण विशेष आनंदाने साजरा करतात.
-
पतीला उदंड आयुष्य लाभावे, अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी नवविवाहिता हे व्रत करतात.
-
या खास प्रसंगी अनुष्काने पोपटी रंगाची आकर्षक डिझायनर नऊवारी साडी परिधान केली होती.
-
नऊवारी साडीबरोबरच अनुष्काने केलेला पारंपरिक दागिन्यांचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सरकटे/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त