-
डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स चयापचय क्रिया सुधारतात, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने जळण्यास मदत होते.
-
डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते आणि जास्त खाणे टळते.
-
हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.
-
यातील फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
-
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ‘कॉर्टिसॉल’ हा स्ट्रेस हार्मोन कमी होतो. तणाव नियंत्रणात राहिल्याने वजन वाढण्याचा धोका टळतो.
-
यातील पोषक घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात, ज्यामुळे तुम्ही वर्कआउट किंवा व्यायामादरम्यान अधिक कॅलरीज बर्न करू शकता.
-
डार्क चॉकलेट आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात राहते.
-
वजन कमी करताना मूड स्विंग्स होणे सामान्य आहे. डार्क चॉकलेट शरीरातील ‘सेरोटोनिन’ (आनंद देणारे संप्रेरक) वाढवून मूड फ्रेश ठेवते.
-
(हेही पाहा : जगभरातील या प्रसिद्ध चिकन रेसिपी नक्की करून पाहा!)
दीडशे किलो बटाटे, चटणीची खास रेसिपी- चेंबूरच्या नंदू वडापावची गोष्ट!