-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) ही मालिका लोकप्रियतेचे नवनवीन उच्चांक गाठत आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) ‘ऐश्वर्या’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळते.
-
प्रतिक्षाने आपल्या उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतीच प्रतिक्षाने स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा ५’ या मंचावर विशेष हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमात प्रतिक्षाचा एक अत्यंत स्टायलिश अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
-
यावेळी प्रतिक्षाने परिधान केलेल्या पीच आणि लाल रंगाच्या गाऊनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
Video: “तुम्ही तुमच्या घरचा फ्रीज उघडून पाहिला तर…” तुकाराम मुंढेंचं संवेदनशीलतेचा अभाव असल्याचं सांगत महत्वाचं आवाहन!