-
झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ (Sanai Chaughade TV Serial) या मालिकेतील ‘परब’ कुटुंब गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहे.
-
याच निमित्ताने मालिकेतील मुख्य अभिनेत्री चिन्मयी साळवी (Chinmayee Salvi) आणि अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) यांनी कोकणात एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो शेअर करत राजने एक खास कॅप्शन दिले आहे “गौरी-गणपतीचा सण, कोकणातील ओल्या वाटा अन् बाप्पाच्या कृपेने फुललेलं हे नातं… जय आणि शारूचा हा ‘K-Drama’ म्हणजेच ‘कोकण ड्रामा’ पाहायला विसरू नका!”
-
या मालिकेत चिन्मयी ‘शर्वरी परब’ (शरू) तर राज ‘जय’ ही भूमिका साकारत आहे.
-
कोकणातल्या गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच असतो. घराघरात बाप्पाचे उत्साहात होणारे स्वागत, पारंपरिक पूजा, आरती, भजन आणि निसर्गरम्य वातावरणात साजरी होणारी मौज हा कोकणातील उत्सवाचा खरा आत्मा आहे.
-
मालिकेच्या आगामी भागांमध्ये हरतालिका पूजन, कार्यशाळेतून गणपती बाप्पाचे आगमन, चार मुलींच्या हातून होणारी बाप्पाची स्थापना, गावातली पारंपरिक आरती, डबल बारी भजन, गौरीचे आगमन आणि भावूक वातावरणात होणारे विसर्जन असे अनेक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
-
तसेच, ढोल-ताशांच्या गजरात गावातील मंडळी डोक्यावरून गणपतीची मूर्ती मिरवणुकीने नेतानाचे दृश्यही या वेळी विशेष आकर्षण ठरेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिन्मयी साळवी/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त