-
गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका आहे.
-
नुकतीच गौतमीने ६२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याला (62nd Maharashtra State Film Awards) खास हजेरी लावली होती.
-
मुंबईतील प्रभादेवी येथील ‘रवींद्र नाट्य मंदिर’ येथे ९ सप्टेंबर २०२६ रोजी ६२वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
-
या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांचा गौरव करण्यात आला.
-
या खास पुरस्कार सोहळ्यासाठी गौतमीने निळ्या रंगाची पारंपरिक पैठणी साडी आणि त्यावर लाल रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाउज परिधान केला होता.
-
या लूकवर गौतमीने गळ्यात सुंदर हार, नक्षीदार कानातले आणि बांगड्या असा पारंपरिक दागिन्यांचा साज केला होता.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना गौतमीने “सहावारी हसू…” असे अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी देशपांडे/इन्स्टाग्राम)
रोज आंघोळ करणं ठीक, पण साबण रोज लावणं गरजेचं आहे का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात?