-
प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) सध्या पत्नी डॉ. मैथिली भोसेकरबरोबर (Maithili Bhosekar) मुन्नारची सफर करत आहे.
-
सिद्धार्थ आणि मैथिलीने दाक्षिणात्य लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सिद्धार्थने गडद गुलाबी रंगाचा शर्ट आणि लुंगी परिधान केली आहे, तर मैथिली सोनेरी रंगाच्या दाक्षिणात्य साडीत दिसत आहे.
-
सिद्धार्थ आणि मैथिलीने हे दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूट मुन्नारमधील एका मंदिराच्या परिसरात केले आहे.
-
मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात वसलेले अत्यंत प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ (हिल स्टेशन) आहे.
-
सिद्धार्थ आणि मैथिलीने २३ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.
-
‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’, ‘राणी मी होणार’ यांसारख्या मालिकांमधून सिद्धार्थ घराघरात लोकप्रिय झाला.
-
आपल्या उत्तम अभिनयाद्वारे सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ खिरीड/इन्स्टाग्राम)
विनोद कांबळीचा निदान वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमधला व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले; ‘काळजी घे..’