-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम आता प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे.
-
महाराष्ट्रातील घराघरात हास्याची उधळण करणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आपल्या यशस्वी प्रवासाची ८ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) घराघरात लोकप्रिय झाली.
-
शिवालीने नुकतेच एका रॉयल अंदाजात फोटोशूट केले असून, सध्या ते सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने पेस्टल गुलाबी आणि लाल रंगाच्या सुरेख साडीची निवड केली आहे.
-
या साडीतील लूकवर शिवालीने परिधान केलेले भरजरी दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
शिवालीने या फोटोशूटला “कोई जाके वैद बुलाओ.. आके धारे मोरी नारी.. हाए राम…” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
नानांवरील तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मल्हार पाटेकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “अशा लोकांना मी…”