-
मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) ही एक लोकप्रिय अभिनेत्री असून तिने हिंदी, तेलुगू, मराठी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
-
मृणालने २०१२ मध्ये ‘मुझसे कुछ कहती… ये खामोशियां’ या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती.
-
त्यानंतर २०१४ मध्ये ‘हॅलो नंदन’ आणि ‘विट्टी दांडू’ या चित्रपटांद्वारे मृणालने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
-
टीव्ही जगतातून सुरुवात करून बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांपर्यंत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मोजक्या मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये मृणालचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
-
सध्या कामानिमित्त दुबईत असलेल्या मृणालने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृणालने खास लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
या लाल रंगाच्या गाऊनवर मृणालने परिधान केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्याला अधिकच शोभा आणली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंना मकरंद अनासपुरेंचा मुलगा म्हणाला, “माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव पुन्हा सुरू करा”; उत्तर व्हायरल