-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा (Shriya Pilgaonkar) बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ (Mirzapur The Movie) हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
अतिशय गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या अभूतपूर्व यशानंतर, ही मालिका आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात अवतरली आहे.
-
श्रियाने २०१८ मध्ये आलेल्या ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये ‘स्वीटी गुप्ता’ हे अत्यंत लोकप्रिय ठरलेले पात्र साकारले होते.
-
सीरिजमध्ये जरी तिच्या पात्राचा शेवट दाखवला गेला असला, तरी ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये श्रिया पुन्हा एकदा ‘स्वीटी’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
चित्रपटात फ्लॅशबॅक, काही अनसीन सीन्स आणि कथेतील महत्त्वाचे ट्विस्ट यांच्या माध्यमातून श्रियाचे पुनरागमन दाखवण्यात आले आहे.
-
श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या एका खास लूकचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रियाने परिधान केलेला सप्तरंगी प्रिंटेड अनारकली ड्रेस तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंना मकरंद अनासपुरेंचा मुलगा म्हणाला, “माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव पुन्हा सुरू करा”; उत्तर व्हायरल