-
Ganesh Chaturthi 2026: महाराष्ट्रात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जेव्हा लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते, तेव्हा पहिल्या दिवशी पारंपरिक तांदळाच्या उकडीचे मोदक बनवण्याची खास परंपरा आहे.
-
मात्र, धावपळीच्या या दिवसांत किंवा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा नैवेद्य दाखवायचा असेल, तर यंदाच्या गणेशोत्सवात तुम्ही हे ५ सोपे व झटपट मोदक नक्की करून पाहू शकता..
-
ड्रायफ्रूट्स खजूर मोदक : बिना साखरेचा पौष्टिक पर्याय! खजूर, काजू, बदाम आणि पिस्ता साजूक तुपात परतून अवघ्या १० मिनिटांत तयार होणारे आरोग्यदायी मोदक.
-
नारळ-गुलकंद मोदक : थंडगार अन् रसाळ चव! सुके खोबरे आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र करून, मध्यभागी गुलकंद व तुटिफ्रुटीचे खमंग सारण भरून बनवले जाणारे मोदक.
-
पनीर-केसर मोदक : रसमलाईसारखी मऊ चव! ताजे किसलेले पनीर, मिल्क पावडर आणि साखर एकत्र परतून त्यात केशर-वेलची घालून बनवले जाणारे स्वादिष्ट मोदक.
-
तिळाचे खमंग मोदक : पारंपरिक व आरोग्यदायी! भाजलेले तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्र दळून, थोडा तुपाचा हात लावून साच्यामध्ये अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारा प्रकार.
-
रवा-बेसन मोदक : खमंग आणि दाणेदार! रवा आणि बेसन तुपात मंद आचेवर छान गुलाबी रंगावर भाजून, त्यात साखर व वेलची पूड घालून झटपट वळले जाणारे मोदक.
-
मोदकांना सुबक आणि एकसारखा आकार देण्यासाठी मोदक साच्याला आतून थोडे साजूक तूप लावा, ज्यामुळे मोदक सहज बाहेर येतात.
रोज आंघोळ करणं ठीक, पण साबण रोज लावणं गरजेचं आहे का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात?