-
‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नेहा खान नेहमीच तिच्या बोल्ड आणि सुंदर अदांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपट, वेब सीरिज आणि विविध मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे.
-
नेहा खानने कोल्हापुरातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे.
-
देवदर्शनासाठी कोल्हापुरात पोहोचलेल्या नेहाने मंदिराच्या परिसरातील काही खास क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
-
या खास प्रसंगी नेहाने गुलाबी रंगाचा अत्यंत सुंदर आणि पारंपरिक चिकनकारी कुर्ता-प्लाझो परिधान केला होता.
-
कपाळावर लाल कुंकवाचा टिळा, कानात झुमके आणि केसात माळलेला गजरा तिच्या या पारंपरिक लूकला अधिकच मनमोहक बनवत होता.
-
तिने मंदिरात अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले तसेच मंदिराच्या प्रांगणात आणि गाभाऱ्याजवळ चाहत्यांसोबत फोटोही काढले.
-
फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘Kolhapur, forever close to my heart. So many memories, one beautiful place. Kolhapur, you’ve been nothing but love. Blessed, grateful, and always happy to be here.’
-
(सर्व फोटो सौजन्य: नेहा खान/इन्स्टाग्राम)
उद्यापासून पैसाच पैसा! चंद्र-शुक्राचा कलात्मक राजयोग ‘या’ ३ राशींना करणार मालामाल; ऐश्वर्य अन् धनसंपत्ती येईल दारी