-
साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही ३९ व्या वर्षी गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे.
-
समंथाने सोशल मीडियावर तिच्या पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या डोहाळे जेवणाचे अत्यंत खास आणि देखणे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती एका मोठ्या, रंगीबेरंगी आणि आकर्षक रांगोळीच्या मध्यभागी पिवळ्या रेशमी साडीत अत्यंत शांत व प्रसन्न वेशात बसलेली दिसते.
-
तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत असून तिने डोळे मिटून त्या धार्मिक आणि कौटुंबिक क्षणाचा मनमोकळा आनंद घेतला आहे.
-
समंथा पिवळ्या आणि केसर रंगाच्या पारंपरिक पोषाखात, गळ्यात फुलांचा हार घालून तिचे जवळचे नातेवाईक व मित्रांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे.
-
या फोटोंसोबत तिने खास कॅप्शन लिहिली आहे: “मी नेहमीच आपल्या परंपरांचा मनापासून आदर केला आहे. प्रत्येक विधीमागील गूढ अर्थ कदाचित मला पूर्णपणे समजणार नाही, पण मंत्रांच्या उच्चारात, जपातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेत आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या प्राचीन प्रथांमध्ये एक सखोल आणि दिव्य शक्ती कार्यरत असते, यावर माझा नेहमीच ठाम विश्वास राहिला आहे.”
-
तिने शेअर केलेले हे सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: समंथा रुथ प्रभू/इन्स्टाग्राम)
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या