-
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे ही आपल्या सहजसुंदर अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेते.
-
अलीकडेच तितीक्षाने आपला पती सिद्धार्थ बोडके याच्याबरोबर माहूरगडच्या श्री रेणुका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
या खास धार्मिक प्रवासाचे सुंदर फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये तितीक्षा अतिशय सुंदर आणि पारंपरिक अशा हिरव्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे.
-
लाल काठ असलेल्या या हिरव्या साडीमध्ये तिचा मराठमोळा आणि सात्विक अंदाज अतिशय खुलून दिसत आहे.
-
गळ्यात नाजूक हार, नाकात नथ, कपाळावर कुंकू आणि चेहऱ्यावर गोड हास्य असा तिचा हा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोंमध्ये त्यांनी रेणुका मातेच्या मूर्तीचे दर्शन घेत मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटल्याचे दिसत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट होताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य: तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
नीला विखेंच्या श्रेयवादाच्या टीकेवर मंत्री राधाकृष्ण विखेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; “आम्ही…”