-
प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि त्याची अभिनेत्री पत्नी दिशा परमार मुंबईतील वांद्रे येथे ९ कोटींच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट झाले आहेत.
-
बॉलीवूडची प्रसिद्ध चित्रपट निर्माती व कोरिओग्राफर फराह खान हिने राहुल आणि दिशा यांच्या या नव्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या (सी-फेसिंग) पेंटहाऊसला भेट दिली.
-
फराह खानने तिच्या नवीन व्लॉगमध्ये राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या आलिशान घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
-
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी फराह खानला त्यांच्या या लक्झरी पेंटहाऊस अपार्टमेंटची संपूर्ण सफर घडवून आणली.
-
या आलिशान पेंटहाऊसच्या गच्चीवर एक मोठे टेरेस गार्डन आणि निसर्गरम्य दृश्य दिसणारा खासगी स्विमिंग पूल आहे.
-
घराच्या गच्चीवर मोकळ्या आकाशाखाली एक आधुनिक काऊंटर आणि किचन एरिया तयार करण्यात आला आहे.
-
या नव्या घराचे लिव्हिंग रूम अत्यंत प्रशस्त असून, तिथे आकर्षक मॉडर्न सोफा, लायटिंग आणि भव्य डिझाईन पाहायला मिळते.
-
राहुल आणि दिशाचे मॉडर्न किचन अत्यंत नीटनेटके आणि आधुनिक सोई-सुविधांनी सज्ज आहे. या आलिशान आणि भव्य घराची सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: फराह खान युट्यूब व्हिडीओ) (हेही पहा: चांदीचा मखर, उकडीचे मोदक अन् वरणभाताचा बेत; सारा तेंडुलकरने शेअर केले घरच्या गणेशोत्सवाचे सुंदर फोटो!)
Photos : ‘तुझ्यात जीव रंगला’फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा पारंपरिक अंदाज चर्चेत