-
प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेत असलेला ‘जयंती २’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
या चित्रपटातील प्रियदर्शनीच्या उत्कृष्ट अभिनयाचे आणि तिच्या व्यक्तिरेखेचे प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
-
‘जयंती २’ चित्रपट यशस्वी ठरल्याने प्रियदर्शनीने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर आणि खास फोटो शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोमध्ये प्रियदर्शनीने जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून त्यावर सोनेरी रंगाची ओढणी घेतली आहे.
-
हातातील सोनेरी बांगड्या, झुमके, छोटीशी टिकली आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे तिचा हा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
मोकळे सोडलेले कुरळे केस, कपाळावर काळी टिकली, न्यूड मेकअप आणि चेहऱ्यावरील सुंदर हास्यामुळे तिचा हा पारंपरिक लूक अधिकच आकर्षक दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना प्रियदर्शनीने ‘Celebrating housefull shows of Jayanti 2, with Festive Vibes !’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
चित्रपटाच्या हाऊसफुल शोचे यश साजरे करतानाचा तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रियदर्शनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”