-
उष्ण आणि दमट हवामानामुळे चेहऱ्यावर येणारा अतिरिक्त घाम, तेलकटपणा आणि बंद होणारे छिद्र टाळून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सोप्या सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
योग्य दिनचर्या आणि काळजी घेऊन तुम्ही संपूर्ण ऋतूत तुमची त्वचा ताजी, सक्षम आणि सुरक्षित ठेवू शकता. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
चेहरा स्वच्छ ठेवा
जास्त दमटपणामुळे चेहऱ्यावर साचणारा घाम, तेल आणि धूळ साफ करण्यासाठी दिवसातून दोनदा सौम्य आणि सल्फेटमुक्त फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मॉइश्चरायझर वापरा
त्वचा तेलकट वाटत असली तरीही तिची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी हलक्या आणि जेल-आधारित मॉइश्चरायझरचा नियमित वापर करावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सनस्क्रीन लावा
ढगाळ वातावरणातही त्वचेचे नुकसान टळावे म्हणून रोज सकाळी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे आणि गरज पडल्यास पुन्हा वापरावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
चेहऱ्याची काळजी घ्या
चेहऱ्यावरील जास्तीचे तेल पुसण्यासाठी वारंवार तोंड न धुता, ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा किंवा हलका फेशियल मिस्ट फवारावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
भरपूर पाणी आणि फळे घ्या
त्वचेचा तजेलदारपणा आणि आरोग्य टिकविण्यासाठी भरपूर पाणी प्यावे अन् आहारात कलिंगड, काकडी व लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
अग्रलेख: मोजक्यांची मक्तेदारी!