-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतील भूमिकेमुळे अभिनेत्री दिशा परदेशी प्रकाशझोतात आली आहे.
-
दिशाने नुकतीच पॅरिसची सफर केली असून, जगप्रसिद्ध आयफेल टॉवरसमोरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दिशा गडद मरून रंगाच्या अत्यंत सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
आयफेल टॉवर (Eiffel Tower) हा फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगात सर्वाधिक ओळखला जाणारा एक ऐतिहासिक व वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
-
हा टॉवर सीन (Seine) नदीच्या काठावर ‘शँप दे मार्स’ (Champ de Mars) या मैदानावर वसलेला आहे.
-
सुरुवातीला हा टॉवर केवळ २० वर्षांसाठी ठेवण्याची योजना होती. मात्र, नंतर रेडिओ आणि टेलिव्हिजन लहरींच्या प्रक्षेपणासाठी याचा वापर होऊ लागल्याने तो कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
रात्रीच्या वेळी टॉवरवर हजारो दिव्यांची मनमोहक रोषणाई केली जाते, ज्यामुळे पॅरिस शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा परदेशी/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”