-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu) सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जोरदार चर्चेत आहे.
-
अलिकडेच गिरिजाने शेअर केलेल्या सोनेरी साडीतील लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये गिरिजाने अत्यंत सुंदर सोनेरी रंगाची साडी आणि त्याला साजेसा मॅचिंग फुल-स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकवर गिरिजाने घातलेले मोठे झुमके तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना गिरिजाने “Turning Heads And Turning Gold” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
गिरिजा प्रभू स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील ‘गौरी’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचली.
-
याशिवाय गिरिजाने ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा प्रभू/इन्स्टाग्राम)
अग्रलेख : पाडायचे की पडायचे?