-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) लवकरच ‘मृत्यूचक्र’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
“एक चक्र… अनेक चेहरे… आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं एक गूढ सत्य! या चक्रातून सुटणार कोण? आणि अडकणार कोण?” अशी या चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी टॅगलाईन आहे.
-
या चित्रपटात अक्षया ‘एसपी संजना’ ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या रहस्यमयी चक्राच्या मुळापर्यंत ‘एसपी संजना’ पोहोचणार की स्वतःच त्यात अडकणार? हे पाहणे रंजक ठरेल.
-
या चित्रपटाच्या पुण्यातील प्रमोशनसाठी अक्षयाने खास पारंपारिक लूक केला होता.
-
या कार्यक्रमात अक्षयाने परिधान केलेल्या गडद गुलाबी रंगाच्या सुंदर पैठणी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या पैठणी साडीवर अक्षयाने अगदी मोजक्या पण आकर्षक दागिन्यांची जोड देऊन आपला लूक पूर्ण केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया गुरव/इन्स्टाग्राम)
अग्रलेख : पाडायचे की पडायचे?