-
झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ (Krushnaichya Leki TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचे महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांसारखे संवेदनशील विषय ही मालिका प्रभावीपणे मांडत आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) ‘इंदुराणी’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.
-
साक्षीने नुकतेच गणेशोत्सवातील तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये साक्षीने पेस्टल रंगाची सिल्क साडी नेसली असून, त्यावर मरून रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या साडीवर साक्षीने परिधान केलेल्या मोत्यांच्या सुंदर दागिन्यांनी तिच्या लूकची शोभा आणखी वाढवली आहे.
-
साक्षीच्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. या उत्सवाचा आणि बाप्पाच्या निरोपाचा एक खास रील व्हिडिओ तिने चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”