-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेचा (Titeekshaa Tawde) बहुप्रतिक्षित ‘बंडखोर’ (Bandkhor Movie) हा चित्रपट २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
एकाच कुटुंबातील सहा स्त्रियांच्या संघर्षाची गोष्ट ‘बंडखोर’ या चित्रपटात पाहायला मिळते.
-
अन्यायाविरोधात बंड पुकारणाऱ्या या सहा महिलांची कथा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी साकारली आहे.
-
या चित्रपटात तितीक्षासह छाया कदम, प्रियदर्शिनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, रावी किशोर, मंगेश देसाई, संकेत पाठक आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यासाठी तितीक्षाने खास वेस्टर्न लूक केला होता.
-
या सोहळ्यात तितीक्षाने काळ्या रंगाचा टॉप, मॅचिंग पँट आणि त्यावर राखाडी रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला होता.
-
तितीक्षाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या नव्या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त