-
अभिनेत्री रेवती लेले ही मराठी, तसेच हिंदी मालिकाविश्वातील एक अत्यंत लोकप्रिय असा चेहरा आहे.
-
तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच रेवतीने पती कौशिक भिडेसोबतचे काही अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटो आणि सोशल मीडियावरील लोकेशननुसार रेवती आणि कौशिक पुण्याजवळ असलेल्या पानशेत येथे एका खास डे ट्रिपसाठी गेले होते.
-
हिरवेगार डोंगर आणि तलावाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर या जोडप्याने अनेक रोमँटिक आणि क्यूट पोज दिल्या आहेत.
-
फोटोंमध्ये रेवती लेले निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश दिसत आहे.
-
या सुंदर जोडप्याचे हे रोमँटिक आणि कॅज्युअल फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवती लेले/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”