-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकरने (Shivani Mundhekar) नुकतेच सोशल मीडियावर गणेशोत्सवातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा, उत्साहाचा आणि भक्तिमय लोकोत्सव मानला जातो.
-
शिवानीच्या घरी गौरी-गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले होते.
-
या गणेशोत्सवात शिवानीने गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी परिधान केली होती.
-
या फोटोंना शिवानीने एक सुंदर कॅप्शन दिले आहे, “बाप्पाचे १० दिवस आणि माझं मन खूप खूश आहे. वर्षातले सर्वात सुंदर दिवस… प्रेम, हसू, कुटुंब, छोटे-छोटे क्षण आणि एका वेगळ्याच निर्मळ आनंदाने भरलेले दिवस. हे तेच दिवस आहेत जे थांबवून कायम जपून ठेवावेसे वाटतात. बाप्पा घरी आणणारा तो गलबला, ती मायेची ऊब, सर्वांची साथ आणि तो खास आनंद… आतापासूनच त्याची आठवण यायला लागली आहे.”
-
यंदा गणेशोत्सव गणेशस्थापनेपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत १२ दिवसांचा होता.
-
शिवानीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी ‘खूप छान’, ‘मस्त’, ‘सुंदर’ अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त