-
आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणारी शिवाली परब नेहमीच नवनवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवालीने नुकतेच तिचे काही आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या नव्या फोटोशूटमध्ये तिने मरून आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनची अतिशय सुंदर साडी आणि डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तिच्या या साडीवरील चमकीदार सिक्विन बॉर्डर आणि डिझाईन तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.
-
या पारंपरिक पोशाखासोबत तिने गळ्यात नाजूक सोन्याची साखळी आणि कानांत सुंदर झुमके घातले आहेत.
-
तिच्या नाकातील सुंदर मोत्याची नथ आणि कपाळावरील चंद्रकोर तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.
-
शिवालीने तिच्या या खास आणि सुंदर फोटोना ‘नाजूक मी नार…’ अशी अतिशय अर्थपूर्ण कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, तिचा हा अंदाज सगळ्यांनाच खूप आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवाली परब/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत