-
पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयशैलीने आणि सौंदर्याने पूजाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच पूजाने एका दहीहंडी कार्यक्रमातील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी पूजाने गडद गुलाबी रंगाची सुंदर इरकल साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपरिक इरकल साडीवर पूजाने मोत्यांच्या दागिन्यांचा साज करून आपला लूक अधिक खुलवला आहे.
-
सोबतच हलका मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईलने पूजाच्या या लूकला खुलवत आहे.
-
पूजा लवकरच ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : शिवानी मुंढेकरने शेअर केले गणेशोत्सवातील खास फोटो; म्हणाली, “बाप्पाचे १० दिवस…”)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त