-
शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ही मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही जगतातील एक लोकप्रिय व लाडकी अभिनेत्री आहे.
-
नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू करणाऱ्या शिवानीने पुढे अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
-
सध्या शिवानी ‘शंकर जयकिशन’ जोडी असावी तर अशी! या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या नाटकात शिवानीबरोबर दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत.
-
शिवानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नवीन फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने प्रिंटेड टॉप आणि गडद हिरव्या रंगाची पॅण्ट परिधान केली असून तिचा लूक अत्यंत आकर्षक दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना शिवानीने “असंच! हसायला कारण नसलं तरी हसलं की कारण आपोआप मिळतं!” असे एक सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
अग्रलेख : पाडायचे की पडायचे?