-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि दक्षता जोईल या दोन्ही गुणी अभिनेत्री एकत्र काम करीत आहेत.
-
मालिकेच्या कथानकामध्ये या दोन्ही अभिनेत्री मायलेकींची महत्त्वपूर्ण आणि सुंदर भूमिका साकारताना दिसत आहेत.
-
नुकतेच सोशल मीडियावर या मायलेकींच्या जोडीचे मंदिरामधील काही खास फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
-
व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये एका मंदिराच्या चौकटीत बसून, त्या दोघी एकमेकींशी संवाद साधताना आणि हसताना दिसत आहेत.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना त्यांनी ‘On screen off screen’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
ऑनस्क्रीन मायलेकींची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रींचे ऑफस्क्रीनसुद्धा अत्यंत गोड आणि घट्ट नाते असल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होते.
-
(सर्व फोटो सौजन्य: दक्षता जोईल/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत