-
महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे सामान्य थकवा, श्वास लागणे किंवा अस्वस्थतेसारखी अस्पष्ट असू शकतात. त्यामुळे तीव्र वेदनांऐवजी या सुरुवातीच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
असाधारण आणि प्रचंड थकवा
अचानक उद्भवणारा, विश्रांतीनंतरही न जाणारा आणि दैनंदिन कामे करताना जाणवणारा असाधारण थकवा हा महिलांमधील हृदयविकाराचा मुख्य पूर्वसंकेत असू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
श्वास घेण्यास त्रास होणे
किरकोळ कामे करताना किंवा पायऱ्या चढताना अचानक दम लागणे आणि श्वास घेण्यास अडचण येणे हे हृदयाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
छातीत दाब, वेदना किंवा अस्वस्थता
छातीत तीव्र वेदनांऐवजी सतत जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवणे हा महिलांमधील हृदयविकाराचा थेट इशारा असू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पाठ, हनवटी, मान, खांदा किंवा हातामध्ये वेदना
छातीऐवजी अचानक मान, पाठ, हनवटी, खांदे किंवा हातांमध्ये वेदना अथवा ताण जाणवणे हा महिलांमध्ये आढळणारा हृदयविकाराचा महत्त्वाचा संकेत आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मळमळ, उलट्या किंवा पोट खराब होणे
कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक मळमळणे, उलट्या होणे किंवा पोटातील अस्वस्थता हा अपचनाचा त्रास नसून हृदयविकाराचा इशारा असू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
भीती, अतिघाम आणि तीव्र अस्वस्थता
कोणत्याही कारणाशिवाय अचानक अतिप्रमाणात घाम येणे, तीव्र भीती वाटणे आणि घाबरल्यासारखे होणे हे हृदयाशी संबंधित आपत्कालीन स्थितीचे लक्षण असू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!