-
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच तिच्या अभिनय आणि स्टाइलमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.
-
अभिनेत्री मिताली मयेकर आता ३० वर्षांची झाली असून या खास प्रसंगी मिताली जॉर्जिया देशातील तिबिलिसी (Tbilisi, Georgia) या निसर्गरम्य शहरात आहे.
-
तिने तिच्या सोलो ट्रिपदरम्यान एका नव्या देशात आणि अनोळखी लोकांसोबत तिचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला आहे.
-
फोटोंमध्ये मिताली निसर्गाच्या सान्निध्यात कपकेक खाताना आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे.
-
तिच्या या सोलो ट्रिपमध्ये भेटलेले अनेक अनोळखी लोक आता तिचे उत्तम मित्र बनले आहेत, जे या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे.
-
तिने या पोस्टला ‘सोलो ट्रिप? जगभरातील अनोळखी लोकांना भेटणे? नवीन मित्र बनवणे? खऱ्या आयुष्यातील क्वीन मोमेंट? नक्कीच अतिशय स्टायलिश. नक्की करून पहावे असे. #turned30instyle’. अशी कॅप्शन दिली आहे.
-
मितालीच्या या स्टायलिश आणि हटके बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंवर तिचे चाहते आणि मनोरंजन विश्वातील कलाकार प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: मिताली मयेकरने/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!