-
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ (Bandkhor) हा बहुचर्चित मराठी चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
हा चित्रपट वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या ६ स्त्रियांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या संघर्षावर आधारित आहे.
-
समाज, कुटुंब आणि पुरुषी मानसिकतेच्या चौकटी मोडून स्वतःच्या अस्तित्वासाठी, निर्णयांसाठी व स्वातंत्र्यासाठी या महिला कशी ‘बंडखोरी’ करतात, हे कथानकात दाखवण्यात आले आहे.
-
या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री छाया कदम यांनी एक महत्त्वाची व मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
-
छाया कदम यांच्याबरोबर या चित्रपटात तितीक्षा तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, रावी किशोर, मंगेश देसाई, संकेत पाठक आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
-
नुकतीच छाया कदम यांनी ‘बंडखोर’ चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती.
-
या ग्रँड प्रीमियरसाठी छाया यांनी नेसलेल्या निळ्या रंगाच्या सिल्क साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत