-
रात्री ८ तासांची शांत झोप न मिळणे, उशिरा झोपणे किंवा झोपेच्या वेळा निश्चित नसणे यामुळे सकाळी उठल्यावर डोके जड वाटू शकते. तुमच्या झोपेच्या वेळा सुधारा आणि शरीराला विश्रांती द्या.
-
रात्रभर शरीर ५ ते ८ तास पाण्याशिवाय असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर सौम्य डिहायड्रेशन होऊन डोके दुखू शकते. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम १ ते २ ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा.
-
रात्री झोपताना सतत विचार करणे किंवा तीव्र मानसिक ताण यामुळे डोक्याच्या आणि मानेच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो.
-
यामुळे सकाळी उठल्यावर डोके दुखण्याची शक्यता असते. झोपण्यापूर्वी मेडिटेशन किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरते.
-
जर तुम्हाला रात्री घोरण्याची सवय असेल किंवा झोपेत श्वास अडकत असेल, तर शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
-
रात्रीच्या वेळी नाकात कफ साचल्यास किंवा सायनसचे इन्फेक्शन असल्यास सकाळी कपाळावर आणि गालांवर दाब जाणवून डोके दुखते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्या.
-
जर तुम्हाला जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर शरीराला कॅफिनची सवय होते. सकाळी वेळेवर चहा किंवा कॉफी न मिळाल्यास ‘कॅफिन विड्रॉअल’मुळे डोके दुखू लागते.
-
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. त्रास जास्त असल्यास किंवा सतत होत असल्यास कृपया तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
किडनी निकामी होण्याआधी युरीक अॅसीड वाढल्याचं शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखा अन् करा डॉक्टरांनी सांगितलेले हे सोपे उपाय