-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
सईने नुकतेच आपल्या कुटुंबासह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध अशा तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री बालाजींचे भावूक वातावरणात दर्शन घेतले.
-
आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले हे तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत आणि भव्य मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
-
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या कोट्यवधी भाविकांसाठी हे मंदिर अथांग श्रद्धा आणि भक्तीचे मुख्य केंद्रस्थान आहे.
-
सईने या धार्मिक प्रवासाचे सुंदर फोटो आणि अनुभव सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
या दर्शनापूर्वी सईने बंगळुरूमधील आपल्या निवासस्थानी लाडक्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात स्वागत केले होते.
-
सईच्या घरातील गणेशोत्सवातील आणि बाप्पाच्या पूजेतील काही खास, अप्रतिम फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्यावर पसंती दर्शवली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)
“गौतमी पाटीललाही मागे टाकलंस भावा!” ‘ढोलकीच्या तालावर’ गाण्यावर पुरुषाची भन्नाट लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “गरिबी अनेकदा कला लपवते”