-
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सध्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
-
हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस प्रदर्शित झाला आहे.
-
त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली नवी पोस्ट प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी अतिशय सुंदर अशा निळ्या रंगाच्या बांधणी साडीत दिसत आहेत.
-
कमीत कमी मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली आणि सुंदर कानातले परिधान करून त्यांनी आपला साडी लूक अतिशय सोबर व एलिगंट ठेवला आहे.
-
सोशल मीडियावरील या फोटोंमधील त्यांच्या साध्या पण तितक्याच सुंदर लूकवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
मृणाल कुलकर्णी यांचा हा नवा साडी लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृणाल कुलकर्णीं/इन्स्टाग्राम)
पुण्यातील ३२ वर्षीय तरुण बनला ९ कोटींचा मालक! पोर्टफोलिओमध्ये कुठलाही टॉपचा फंड नाही; केवळ ७ सोपे नियम