-
मराठी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडेने आपल्या खास शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
गौतमीने नुकतेच सोशल मीडियावर काही नवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिने नेसलेली पांढऱ्या रंगाची सिल्क साडी, ज्यावर सुरेख फ्लोरल प्रिंट्स आहेत, तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
या साडीबरोबर तिने गळ्यात मोतींचा नाजूक हार घालून आपला लूक अतिशय साधा पण शोभिवंत ठेवला आहे.
-
एका फोटोमध्ये ती हातामध्ये पुस्तक घेऊन विचारमग्न बसलेली दिसत असून, ब्लॅक अँड व्हाईट फ्रेममध्ये हा फोटो खूपच मनमोहक वाटतो.
-
हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना तिने ‘Old soul, vintage mood. Some styles never go out of time.’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
गौतमीचा हा व्हिंटेज अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौतमी देशपांडे/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय