-
नवरात्रीची सुरुवात या वर्षी ११ ऑक्टोबरपासून होत असून, त्याची भव्य उत्सुकता आणि सोहळ्याची सुंदरता आतापासूनच बाजारात पाहायला मिळत आहे.
-
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात महिला पूजा-पाठ करण्यासोबतच स्वतःला नटण्या-सवरण्यावर आणि पेहरावावरही विशेष लक्ष देताना दिसतात.
-
या सणाच्या काळात महिला प्रामुख्याने लेहंगा चोली, अनारकली सूट, शरारा आणि एथनिक कुर्ती परिधान करण्यास पसंती देतात.
-
बांधनी प्रिंट कुर्ती
ऑफिस, मंदिर किंवा कॉलेजमध्ये नवरात्रीचा लूक खास बनविण्यासाठी महिला बांधणी प्रिंट कुर्ती जीन्स किंवा लेहंग्याबरोबर परिधान करू शकतात. -
स्टायलिश कुर्ती
नवरात्रीत ऑफिस-कॉलेजसाठी साईड कट आणि रॅप डिझाईनच्या स्टायलिश कुर्ती व्हाईट ट्राऊझर किंवा प्लाझोबरोबर परिधान करता येतात. -
प्रिंटेड कुर्ती
साध्या कुर्तीऐवजी स्कर्ट किंवा पॅन्टसोबत शॉर्ट अथवा लाँग प्रिंटेड कुर्ती अशी कपड्यांची जोडी बनवून आकर्षक एथनिक लूक तयार करता येतो. -
अनारकली
नवरात्रीची पूजा, गरबा किंवा दांडिया नाईटसाठी अनारकली आणि युनिक डिझाइनच्या कुर्ती परिधान करून, पारंपरिक लूक मिळवता येतो. -
मिरर वर्क कुर्ती
नवरात्रोत्सवाच्या खास प्रसंगी मिरर वर्क कुर्ती परिधान करून, त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि लाईट मेकअपचा वापर केल्यास लूक अधिक खास दिसतो.
शिवाजी पार्कवरील आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…