-
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईक सध्या तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
-
अक्षयाने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने काळ्या आणि राखाडी रंगाचा प्रिंटेड स्लीव्हलेस मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे.
-
हातामध्ये एक काळ्या रंगाची स्टायलिश क्लच बॅग, मनगटात स्मार्ट वॉच आणि पायांत कम्फर्टेबल हिल्स परिधान करून अक्षयाने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि चेहऱ्यावरील सुंदर स्मितामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
या पोस्टला तिने , ‘I used to be very, very, verrrry conscious of wearing sleeveless clothes. Today, I honestly don’t care. I’ve come a long way in accepting my body just as it is.’ (पूर्वी मला स्लीव्हलेस कपडे घालताना खूप संकोच वाटायचा; पण आज मला त्याची पर्वा नाही. माझं शरीर जसं आहे, तसं स्वीकारण्यासाठी मी खूप पुढे आले आहे.) अशी कॅप्शन दिली आहे.
-
अक्षयाचा हा आत्मविश्वासपूर्ण लूक पाहून, चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया नाईक/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!