-
भारतात सुक्या मेव्याचा (ड्राय फ्रूट्स) मोठा वापर केला जातो. देशात अक्रोड, बदाम, पिस्ता आणि काजू यांसारख्या विविध सुक्या मेव्यांचे उत्पादन घेतले जाते.
-
भारतातील प्रमुख राज्यांमध्ये होणारे सुक्या मेव्याचे उत्पादन खालीलप्रमाणे आहे.
-
अक्रोड: जम्मू-काश्मीर हे भारतातील अक्रोड उत्पादनात अव्वल स्थानी आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, लडाख आणि मणिपूर या भागातही अक्रोडाचे उत्पादन घेतले जाते.
-
बदाम: बदामाच्या उत्पादनातही जम्मू-काश्मीर अग्रस्थानी आहे. काश्मीरमधील बडगाम, श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, गांदरबल आणि बारामुल्ला या भागात मोठ्या प्रमाणात बदामाची शेती होते.
-
काजू: काजू हे भारतातील प्रमुख व्यावसायिक पिकांपैकी एक आहे. याची शेती प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांमध्ये केली जाते.
-
पिस्ता: भारतामध्ये पिस्त्याची शेती अतिशय मर्यादित प्रमाणात होते. जम्मू-काश्मीरमध्ये काही प्रमाणात पिस्त्याचे उत्पादन घेतले जाते, परंतु भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असणारा बहुतांश पिस्ता हा आयातीवरच अवलंबून असतो.
-
चिलगोजा: चिलगोजा हे अत्यंत महत्त्वाच्या सुक्या मेव्यांपैकी एक मानले जाते. हिमाचल प्रदेशातील किन्नौरसारख्या हिमालयातील उंच, थंड आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशात याचे उत्पादन प्रामुख्याने होते.
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त