-
अभिनेत्री रेवा कौरसे ही ‘बिग बॉस मराठी ६’ या लोकप्रिय रिॲलिटी शोमुळे घराघरात पोहोचली आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि हटके शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रेवाने नुकतेच तिचे काही अत्यंत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये रेवाने परिधान केलेल्या पारंपारिक लाल रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
रेवाने साडीसोबत डिझायनर स्ट्रॅपलेस ब्लाऊज परिधान केला असून, तिच्या लूकला मॉडर्न टच दिला आहे.
-
दागिन्यांबद्दल बोलायचे तर, तिने कानात वजनदार झुमके, नाकात पारंपारिक नथ आणि हातात डिझायनर सोन्याच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
केसात माळलेला पांढऱ्या फुलांचा लांब गजरा तिच्या या रॉयल लूकची शोभा आणखी वाढवत आहे .
-
रेवाचा हा पारंपरिक आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून, तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवा कौरसे/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत