-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री गौरी नलावडे (Gauri Nalawade) लवकरच ‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futaacha Bachchan Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
कीर्तनातून प्रसिद्धीस आलेल्या एका तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिमाखात लाँच करण्यात आला.
-
टीझरला मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर आता ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौरीने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या सॅटिन ड्रेसमधील काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यांना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
-
कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
-
या चित्रपटात गौरीबरोबर श्रुती मधुदीप, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट ९ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय