-
ईशा केसकर (Isha Keskar) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय, अभ्यासू आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
उत्कृष्ट अभिनय आणि सहज व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर ईशाने मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘समर्थ’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील ईशाच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले.
-
‘समर्थ’ चित्रपटात ईशाने ‘सुमा’ ही अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली असून, तिच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
-
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या ईशाने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून, सध्या तिच्या या लूकची इन्स्टाग्रामवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
या नवीन फोटोशूटमध्ये ईशाने तपकिरी रंगाचा डिझायनर प्रिंटेड कुर्ता परिधान केला असून, तिचा हा पारंपरिक अंदाज खूपच उठून दिसत आहे.
-
मोकळे सोडलेले केस, हलका आणि नॅचरल मेकअप आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य यामुळे तिच्या या फोटोशूटमधील प्रत्येक फोटो लक्षवेधी ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा केसकर/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत