-
जगप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच तिच्या अप्रतिम सौंदर्य आणि अभिनयाद्वारे जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आली आहे.
-
नुकतीच तिने पॅरिस फॅशन वीक (Paris Fashion Week) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोहळ्यात सहभाग नोंदवून रॅम्प वॉक केला आहे.
-
या सोहळ्यातील तिचे अनेक आकर्षक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
या खास सोहळ्यासाठी ऐश्वर्याने अत्यंत भव्य आणि डिझायनर असा काळ्या रंगाचा वेल्वेट गाऊन परिधान केला होता.
-
तिच्या या काळ्या पोशाखावर आणि केपवर सुंदर मोत्यांची व खड्यांची नक्षीकाम केलेली बॉर्डर होती, ज्यामुळे तिच्या लूकला अधिकच राजेशाही स्पर्श मिळाला होता.
-
लाल रंगाची लिपस्टिक आणि मोकळे केस यांमुळे तिचा हा लूक एखाद्या राणीसारखा अत्यंत भव्य आणि आकर्षक दिसत होता.
-
रॅम्पवर चालताना तिने प्रेक्षकांच्या दिशेने हाताने प्रेमाचे चिन्ह (Heart Sign) करीत आपल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या राय/इन्स्टाग्राम)
घटस्थापना नेमकी कधी आहे? जाणून घ्या घट बसविण्याचे शुभ मुहूर्त, घट कसे बसवावे अन् पूजेचे संपूर्ण नियम