-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली खरे व नेहा पेंडसे या तिघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
-
या तिन्ही अभिनेत्री सध्या इटलीमध्ये एकत्र फिरत आहेत. अभिनेत्री सोनाली खरे हिने या खास ट्रिपचे सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये या तिघी इटलीच्या ऐतिहासिक शहरांमधील रस्ते आणि नदीकाठच्या रात्रीच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
एका फोटोत अमृता, सोनाली व नेहा इटलीतील एका पुलावर एकत्र बसून, रात्रीच्या सुंदर प्रकाशात आनंदी पोज देताना पाहायला मिळत आहेत.
-
क्लोज-अप सेल्फी फोटोमध्ये या तिन्ही अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरचा मनमोकळा आनंद आणि हसू स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
या ट्रिपदरम्यान तिन्ही अभिनेत्रींचा अंदाज खूपच स्टायलिश दिसत आहे या तिघींचा इटली ट्रिपचा हा कूल लूक सध्या त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांकडून या तिघींच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता खानविलकर आणि सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय