-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, कुशल दिग्दर्शिका आणि सूत्रसंचालक म्हणून मृण्मयी देशपांडे हिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
अभिनयाबरोबरच आपल्या सौंदर्याने नेहमीच लक्ष वेधून घेणाऱ्या मृण्मयीने नुकतेच तिचे एक नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये मृण्मयीने गडद मरून रंगाची अत्यंत देखणी साडी परिधान केली आहे, जी तिच्या रूपाला एक शाही आणि पारंपारिक लुक देते.
-
या साडीसोबत तिने मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला असून, त्याच्या गळ्यावर आणि कडेला सुरेख डिझायनर वर्क पाहायला मिळत आहे.
-
तसेच तिने एका हातात मोठे पारंपारिक डिझाईन असलेले अंगठी परिधान करून तिच्या दागिन्यांची निवड अगदी सुरेख ठेवली आहे.
-
कपाळावर छोटी नाजूक टिकली, बांधलेले केस आणि मिनिमल मेकअपमुळे तिचा हा लुक अत्यंत मोहक आणि सोज्वळ दिसत आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर हे सुंदर फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”