-
झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री भूमिजा पाटील (Bhumija Patil) सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
भूमिजाने या मालिकेत ‘स्वीटी’ ही खलनायिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भूमिजाने एक खास नृत्य सादरीकरण केले.
-
या सादरीकरणासाठी भूमिजाने श्री खंडोबा देवांची दुसरी पत्नी म्हणजेच ‘बानूबाई’ यांचा पारंपरिक लूक साकारला होता.
-
भूमिजाने नेसलेली निळ्या रंगाची अन् पोपटी काठाची सुंदर साडी, त्याला साजेसे पारंपरिक दागिने आणि कपाळावर भरलेला हळद-कुंकवाचा मळवट तिच्या या लूकला अधिक उठावदार बनवत होता.
-
भूमिजाच्या या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.
-
भूमिजाने याआधी ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘माझी माणसं’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूमिजा पाटील/इन्स्टाग्राम)
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय