-
ऋजुता देशमुख (Rujuta Deshmukh) या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
आपल्या सोज्वळ सौंदर्य आणि सहज अभिनयाच्या जोरावर ऋजुता यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतीच ऋजुता यांनी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती.
-
या खास सोहळ्यासाठी ऋजुता यांनी नेसलेली पिवळ्या रंगाची सुंदर कॉटन साडी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
-
आनंद दिलीप गोखले लिखित आणि दिग्दर्शित ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाची निर्मिती ‘फाईन ब्रू प्रोडक्शन्स’ आणि ‘ट्रू होप फिल्म्स वर्क’ यांनी केली आहे.
-
जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे यांनी या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
-
हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋजुता देशमुख/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंना मकरंद अनासपुरेंचा मुलगा म्हणाला, “माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव पुन्हा सुरू करा”; उत्तर व्हायरल