-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) लवकरच ‘गणा धाव रे’ (Gana Dhav Re Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटाची कथा कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित असून, यात दंतकथा, भक्ती आणि माणुसकीच्या भावविश्वात गुंफलेले कथानक पाहायला मिळणार आहे.
-
गणपती बाप्पावरील नितांत श्रद्धा, गावकुसातील परंपरा आणि सामूहिक भावनांचे प्रभावी चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे.
-
या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगताना काजल म्हणाली, “या सिनेमात माझी भूमिका छोटी असली, तरी ती माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाची आहे. माझ्या अभिनय प्रवासाची ही पहिली पायरी बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होतेय, यापेक्षा सुंदर गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणतीच असू शकत नाही.”
-
सध्या सोशल मीडियावर काजलच्या साडीतील नव्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये काजलने मोरपंखी रंगाची प्लेन साडी आणि त्यावर प्रिंटेड स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे, ज्यातील तिचा साधेपणा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिरमुले आणि सुलभा आर्या यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजल काटे/इन्स्टाग्राम)
पैसा जाणार, खर्च, टेन्शन वाढणार…पुढचे २४२ दिवस शनिदेव ‘या’ राशींची कठोर परीक्षा घेणार; कर्माचा हिशोब होणार