-
Amruta Khanvilkar Neha Pendse Sonali Khare Italy Vacation: अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या मराठी मनोरंजनसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
सध्या या तिघी इटलीमध्ये आपल्या खास ‘गर्ल्स ट्रिप’चा आनंद घेत आहेत.
-
फ्लोरेन्ससारख्या इटलीतील सुंदर शहरांमध्ये भटकंती करतानाचे अनेक खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अस्सल इटालियन पिझ्झा, पास्ता आणि तिरामीसूचा आस्वाद घेण्यापासून ते रस्त्यांवर जड बॅगा ओढत फिरण्यापर्यंतचे त्यांचे मजेशीर व्हिडियो चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडत आहेत.
-
चित्रपटसृष्टीत स्पर्धा असली, तरीही या तिघींमध्ये अत्यंत घट्ट आणि विश्वासाचे नाते आहे.
-
एका मुलाखतीत अमृताने सांगितले होते की, “आई आणि बहिणीनंतर मी सोनालीवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते.”
-
नेहाबद्दल बोलताना अमृता म्हणाली होती की, “नेहा अत्यंत मोकळ्या आणि स्पष्ट विचारांची आहे.” जेव्हा जेव्हा या तिघी एकत्र येतात, तेव्हा प्रोफेशनल लाईफ बाजूला ठेवून त्या भरभरून गप्पा मारतात आणि मनसोक्त आनंद लुटतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत