-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौरी नलावडेचा (Gauri Nalawade) ‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futaacha Bachchan Movie) हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
“नशिबाच्या खेळात हरली तरी कष्टाच्या मैदानात पाय रोवून लढणारी… आमची ‘पाच फुटाचा बच्चन’!” अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे.
-
कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून, राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
-
या सोहळ्यासाठी गौरीने नेसलेल्या मरून रंगाच्या सुंदर साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
साडीवर गौरीने परिधान केलेल्या मोत्यांच्या मोजक्याच दागिन्यांमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत होता.
-
या चित्रपटात गौरीबरोबर शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम)
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळं विमान पाडण्याचा कट अपयशी ठरल्यानंतर ओमानी वैमानिकानं काय केलं? नवी माहिती समोर