-
अति तेथे माती! खूप जास्त भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने पोटात गॅस, फुगणे आणि दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
-
हेल्दी स्नॅक मानल्या जाणाऱ्या या बियांमध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अतिसेवनाने वजन वेगाने वाढू शकते.
-
बिया मधील जास्त फायबर फायदेशीर असले, तरी पुरेसे पाणी न प्याल्यास अतिप्रमाणातील फायबरमुळे बद्धकोष्टाचा त्रास होऊ शकतो.
-
काही लोकांना भोपळ्याच्या बियांची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा पुरळ उठणे अशा समस्या दिसू शकतात.
-
या बिया रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, पण जर तुम्ही बीपीची औषधे घेत असाल आणि अतिसेवन केले, तर ब्लड प्रेशर धोकादायक पातळीपर्यंत खालावू शकते.
-
यातील तेल आणि फायबरचे जास्त प्रमाण पचनसंस्थेवर ताण आणते, ज्यामुळे काहींना जुलाबाचा त्रास होऊ शकतो.
-
मधुमेहाच्या रुग्णांनी याचे अतिसेवन टाळावे, कारण औषधांसोबत या बिया जास्त खाल्ल्यास शुगर लेव्हल अचानक खूप खाली जाऊ शकते.
-
योग्य प्रकारे चावून न खाल्यास किंवा खूप जास्त प्रमाणात खाल्यास अन्ननलिकेत जळजळ आणि पचनास जड जाणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात.
आतड्यात वर्षानूवर्ष साचलेला मल १ दिवसात होईल साफ! रोज सकाळी ‘रिकाम्या पोटी’ करा हा १ आयुर्वेदिक उपाय